Tuesday, August 23, 2016

परिवहनमंत्र्यांच्या हस्ते विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन


            सातारा, दि. 23 (जिमाका) :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन 25 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 वाजता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हनकर यांनी दिली आहे.
            हा कार्यक्रम पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी  प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पशुसवंर्धन मंत्री महादेव जानकर उपस्थित राहणार आहे.  या कार्यक्रमास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देवोल आदींचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे, असेही श्रीमती ताम्हनकर यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment