Thursday, August 18, 2016

समाजात देशभक्तीची भावना, शौर्य जागृत ठेवण्याची गरज : मुख्यमंत्री






पुणे, दि. 18: - समाजाची मानसिकता गुलामीची झाली तेव्हा देश पारतंत्र्यात गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभे करण्यासाठी मनानी गुलाम झालेल्या समाजाच्या मनात देशप्रेम निर्माण करुन शौर्य जागृत केले. त्यामुळे समाजातील देशभक्तीची भावना शौर्य नेहमीच टिकले पाहिजे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची 316 वी जयंती निमित्त येथे टिळक स्मारक सभागृहात थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, आमदार श्रीमती मेधा कुलकर्णी, पेशवे यांचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा पुरस्कारर्थी भारताचे पहिले आंतराळवीर अशोकचक्र सन्मानित विंग कंमाडर (नि) राकेश शर्मा, उद्योजक डॉ. अभय फिरोदिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
            याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य दिलेत्याचा विकास बाजीराव पेशव्यांनी केला.20 वर्षाच्या तरुणाला पेशवा बनविण्याचे दृष्टिपण छत्रपती शाहू महाराजांनी हेरले आणि बाजीरावांनी ते खरे करुन दाखविले. त्यांनी नवनवीन युध्दनितीचा अवलंब केला. ही युध्दनिती अमेरिकेत शिकविली जाते, त्याचा अभ्यास केला जातो. बाजीराव पेशवे याची युध्दनिती , गती परकीयांपेक्षा 10 पट जास्त हेती. म्हणून त्यांनी प्रत्येक युध्दात विजय मिळविला, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.
            आज देशासमोर अनेक आव्हाने आहेत, आपल्यातील राष्ट्रीय भावना कमी होते तेव्हा देशविघात शक्ती आपला चेहरा दाखवायला लागतात. असे सांगुन मुख्यमंत्री फडणवीस  म्हणाले की पंतप्रधानांनी काश्मिर तर आमचे आहेत. पण पाकव्याप काश्मिर आमचे आहे. ते आम्ही मिळविणार  अशी खंबीर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानच्या कारवाया वाढत आहे. पण आपल्या सैनिकांनीही शौर्याने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे. समाजातील शौर्य जागृत करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले.मागील वर्षापासून हा शौर्य पुरस्कार देण्यात येत आहे. देशप्रेमासाठी महान कार्य केलेल्या राकेश शर्मा यांना हा पुरस्कार देवून सन्मान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी  आनंद व्यक्त्केला.
            यावेळी पुरस्कारर्थी राकेश शर्मा म्हणाले की, देशाच्या महानयोध्दाच्या नावाने पुरस्कार देवून सन्मानित केले गेले हे माझे भाग्य  आहे. हा गौरव केवळ माझा नसून भारतीय सैन्य दलाचा आहे. अशी कृतज्ञता  ही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उद्योजक डॉ. अभय फिरोदिया म्हणाले की बाजीराव पेशवे याच्या जन्मदिनी देशाच्या योद्ध्यांच्या सत्कार  करण्याचा संयोजकाचा  स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले.

00000


No comments:

Post a Comment