Friday, August 26, 2016

महा अवयवदान अभियांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन


            सातारा, दि. 26 (जिमाका) : महा अवयवदान अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी दिली आहे.
            या अभियानांर्तगत दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता महा अवयवदान अभियानाचा शुभारंभ व अवयवदान जागृती महारॅली काढण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता महा अवयवदान चर्चासत्र, निबंध व चित्रकला स्पर्धा होणार आहे. यामध्ये शहरातील महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. तसेच 11 वाजता जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 1 सप्टेंबर रोजी महा अवयवदान अभियान नोंदणी शिबीराचे उद्घाटन व अवयवदान नोंदणी व अवयवदान दात्यांचा सन्मानही करण्यात येणार असल्याचे डॉ. भोई यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment