Tuesday, August 23, 2016

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे आवाहन



सोलापूर दि.23 : - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे मातंग समाज व तत्सम 12 पोट जातींतील लाभार्थ्यासाठी सन 2012-13 2014-15 या वर्षात मोठया प्रमाणावर कर्जवितरण करण्यात आले आहे. सदर कर्जवितरणात अनियमितता झाली असल्याकारणाने सध्या चौकशी सुरु आहे.
जिल्हयातील संबंधित लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या  कार्यालयात , सर्व ग्रामपंचायती कार्यालयात, तहसिल कार्यालय व पंचायत समितीच्या कार्यालयाच्या फलकावर कर्ज रकमेसह प्रसिध्द करण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांना ती रक्क्म मिळाली नसल्यास अथवा कर्ज वितरणा संदर्भांत काही तक्रार असल्यास संबंधितांनी  022-22672585/27571485 या दूरध्वनीवर तसेच hccidcrimekb@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ (मर्या.), सोलापूर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

                                              0 0 0 0

No comments:

Post a Comment