Sunday, August 14, 2016

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आज सायबर लॅब,अभ्यागत कक्षाचे उद्घाटन


पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते
               आज सायबर लॅब,अभ्यागत कक्षाचे उद्घाटन

 सोलापूर दि. 14: -  मुख्यमंत्री  तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या सायबर लॅब आणि नागरिकांसाठीच्या अभ्यागत कक्षाचे उद्घाटन उद्या, 15 ऑगस्ट 2016 रोजी करण्यात येणार आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे आणि खासदार विजयसिंह मोहिते - पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रम  सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे सकाळी 11.00 वाजता होणार आहे.
                    यावेळी आमदार गणपतराव देशमुख, प्रणितीताई शिंदे, दिलीप सोपल, बबनराव शिंदे, सिध्दराम म्हेत्रे, भारत भालके, हनुमंत डोळस, नारायण पाटील, रामहरि रुपनवर, प्रशांत परिचारक, जिल्हाधिकार रणजीतकुमार, आयुक्त रवींद्र सेनगांवकर आदी उपस्थित  राहणार आहेत.
                   या  लॅबमुळे इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालणे शक्य होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पालीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment