Thursday, August 25, 2016

अवयवदाना संदर्भात व्यापक जागृती हवी - मनपा आयुक्त पाटील


सोलापूर दि.25 : -   मानवी जन्म नश्वर आहे. मानवी जीवनात व्यक्तींने समाजासाठी संस्मरणीय कार्य करावे. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात मानवी अवयवदाना संदर्भात अनेक गैरसमजूती आहेत. याकडे सामंजस्याने तसेच विवेकी विचाराने पहावे. अवयवदाना संदर्भात व्यापक जागृती  होवून ही चळवळ संपूर्ण देशात वाढावी, अशी अपेक्षा मनपा आयुक्त विजय काळम - पाटील यांनी केली.
                      येत्या 30 ऑगस्ट ते 1 सप्टेबर या कालावधीत संपूर्ण राज्यभर अवयवदान जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासंदर्भात व्ही.एम. मेडिकल कॉलेज येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
                      व्यासपीठावर वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, डॉ. माधवी रायते. जिल्हा शल्य चिकित्सक                 डॉ. मल्ल्किार्जून पट्टणशेट्टी, सर्जरी विभागाच्या प्रमुख श्रीमती डॉ. ए. एस. वरुडकर, सहायक पोलीस आयुक्त महेश जोशी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके, एन.सी.सीचे प्रमुख कर्नल शर्मा आदी उपस्थित होते.
                     श्री. पाटील पुढे म्हणाले की, मी व श्रीमती काळम पाटील या दोघांनीही स्वत:च्या शरीरातील काही अवययवदानाचा निर्णय घेतला असून त्याद्ष्टीने संबंधितांना फॉर्मही भरून दिले आहेत. कुटुंबातील किमान एका व्यक्तीने अवयवदानासाठी पूढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. तर वैद्यकीय अधिष्ठाता श्री. पोवार म्हणाले की, शेजार राष्ट्र श्रीलंकेच्या तूलनेत भारतात अवयवदान संदर्भात कमी जागृकता आहे, ही जागरुकता वाढावी यासाठी नागरिकांनी पूढाकार घ्यावा त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांनी अवयवदाना संदर्भात अवयवदात्याला व अवयव ग्राह्य करणाऱ्याला शास्त्रीय व कायदेशीर माहिती द्यावी.
                    किडनी, लिव्हर, हार्ट, त्वचा, लंग्ज, या सारख्या सुमारे अकरा अवयव संबंधिताला दान करता येत असल्याची माहिती  सर्जरी  विभागाच्या श्रीमती डॉ. वरुडकर यांनी अवयवदाना संदर्भात मार्गदर्शन करतांना दिली. यावेळी या संदर्भात्‍ शंका निरसन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाबाबत जन जागृती व्हावी यासाठी दि. 30 ऑगस्ट रोजी  निबंध स्पर्धा , पोष्टर कॅम्पेन (भित्ती पत्रके), रांगोळी स्पर्धा तसेच रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आली.
0000

No comments:

Post a Comment