Sunday, August 14, 2016

स्वातंत्र्यसैनिक, वीर पत्नींचा तिरंगा यात्रेत सत्कार








स्वातंत्र्यसैनिक, वीर पत्नींचा तिरंगा यात्रेत सत्कार
सोलापूर दि. 14: - स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि देशासाठी बलिदान देणा-या शूर जवानांच्या पत्नी यांचा आज सत्कार करण्यात आला.
                          केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशातील 100 जिल्ह्यात आज तिरंगा यात्रेचे आयेाजन करण्यात आले होते. या तिरंगा यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक आणि वीर पत्नी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, सोलापूर महापालिकेचे आयुक्त विजय काळम – पाटील आदी उपस्थित होते.
                          तिरंगा यात्रा सात रस्ता चौक येथून सुरुवात झाली. तेथून पुढे जुना एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक, पार्क चौक, सरस्वती चौक, लकी चौक मार्गे चार पुतळा येथे आली. या यात्रेत शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवत, स्काऊट विद्यार्थी, एन.सी.सी छात्र सहभागी झाले होते.
                         चार पुतळा येथे जिल्हाधिकारी रणजीतकुमार, आयुक्त विजय काळम – पाटील आणि डॉ. श्रीकांत येळगावकर यांची भाषणे झाली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक सर्वश्री दत्तात्रय हिबारे, प्रल्हाद वाघमोडे, नामदेव शिंदे, अनिल भरमदे आणि वीरपत्नी साजिया शेख, लक्ष्मी चौगुले, सविता माने यांचा सत्कार करण्यात आला. यात्रेचे संयोजन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रमोद हिंगे, सुभाष चव्हाण, संजय कुरणे, अनिल हिंगे, बापू वारे, मधुकर चव्हाण, सुनील पाटील यांनी केले. 

No comments:

Post a Comment