Tuesday, August 23, 2016

हवेली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवणूकीसाठी आयुक्तालय कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान


पुणेदि. 23: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने  हवेली तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीमधील 14 रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. शासकीय धान्य गोदाम क्र.सी-६, शिवाजीनगर, पुणे -5 येथे पोटनिवडणुकीचे नामनिर्देश पत्र स्विकारण्याची कार्यवाही व निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. मतदानानंतर मतपेट्या शासकीय गोदामात तयार करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सदरहू ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी पोलीस सह आयुक्त सुनिल रामानंद यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1951 च्या कलम 36 अन्वयेआयुक्तालय कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांना लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. यानुसार  रस्त्यावरुन जाणाऱ्या जमावाचे अगर मिरवणूकीत व्यक्तीचे वागणे अगर कृत्याबाबत आदेश देणे, ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ती वेळ निश्चत करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणूकीच्या कार्यक्रमाच्यावेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पिकरच्या ध्वनीची तिव्रता निश्चित करुन दिलेली वेळ यावर नियंत्रण करणे, मिरवणूकीचे प्रचाराच्यानिमित्ताने जाहीर सभा घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत नियंत्रण करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. हा आदेश शहर पेालीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील शासकीय धान्य गोदान क्रमांक सी-6, शिवाजीनगर, पुणे-5 शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हददीत 26 ऑगस्ट,2016 च्या रात्री 12-00 वाजेपर्यत लागू राहील. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती मुंबई पोलीस ॲक्ट 1951 च्या कलम 134 नुसार शिक्षेस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
000

No comments:

Post a Comment