Friday, August 19, 2016

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची गती वाढवावी - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे




पुणे : १९- मुख्यमंत्री ग्रामसडक योजना हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे.या योजनेची कामे वेळेत झाली पाहिजेत. तसेच या कामांची गती वाढवावी अशा सूचना महिला बालकल्याण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.
            यशदा येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव व्ही. आर. नाईक, सहसचिव डी. जी. मोरे, मुख्य अभियंता व्ही.डी. पालवे, उपसचिव आर. ए. नागरगोजे आदि उपस्थितीत होते.
            सदरली बैठकीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१५-१६ या वर्षासाठी निश्चित केलेल्या २००० किमी लांबीच्या ३३३ रस्त्याच्या कामावर आढावा घेतला. यातील प्रगतीपथावरील व सुरु करण्यात आलेल्या कामाची माहिती घेतली. सदरची कामे पावसाळा संपलानंतर त्वरित सुरु करुन गतिमानतेने पूण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सन २०१६-१७ करिता दर्जोउन्न्ती निश्चित केलेल्या ५२०० किमी लांबीच्या रस्त्यांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया करणे, कामाचे आदेश देणे, आदिबाबतचाही आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
            या योजनेकरिता आतापर्यंत सन २०१६-१७ मध्ये एकूण उपलब्ध झालेला ६०० कोटी रुपयांचा निधी चांगले काम करुन आर्थिक वर्षात पूर्ण करण्याच्या सूचनाही श्रीमती मुंडे यांनी संबंधितांना दिल्या.
            तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचा सविस्तर आढावा श्रीमती मुंडे यांनी यावेळी घेतला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत २०१६-१७ मध्ये १९०० किमी लांबीची दर्जोउन्न्ती (खडकीरकण, डांबरीकरण) आणि ३९ वाड्या वस्त्या जोडणे या योजनेतंर्गत संशोधन ‍व विकास अंतर्गत ४७६ किमी कामे करणे यामध्ये वेस्ट प्लॅस्टिक मटेरियल व कोल्ड मिक्सचा वापर करणे. राज्यातील इतर जिल्हामार्ग व ग्रामीण मार्ग यांचे मॅपिंग करुन
त्याआधारे रस्त्याच्या नियोजन व बांधकामावर नियंत्रण ठेवण्यासाठी GIS प्रणाली डिसेंबर २०१६ पर्यंत विकसित करणे आदिबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

No comments:

Post a Comment