Monday, August 22, 2016

धावपटू ललिता बाबरचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव


मुंबईदि. 22 :  रिओ ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्‍सच्या स्टीपलचेस स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या साताऱ्याच्या ललिता बाबरचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे गौरव केलातसेच तिला राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्याचा प्रस्तावही त्यांनी दिला.
ऑलिम्पिकचे प्रमुख आकर्षण असलेल्या ॲथलेटिक्‍समधील तीन हजार मीटर स्टीपलचेस या शर्यतीत ललिताने अंतिम फेरी गाठताना राष्ट्रीय विक्रम नोंदविला. पी. टी. उषाने 1984 मध्ये ऑलिंपिकची अंतिम फेरी गाठली होती. सातारा जिल्ह्यातील (ता.माण) 27 वर्षीय ललितामुळे राज्याचा सन्मान झाला आहेतिच्या भावी कारकिर्दीला शुभेच्छा देतानाच राज्य शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईलअसे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
----------------

No comments:

Post a Comment