Friday, August 12, 2016

हुंड्याबातच्या जाहिरातीस मनाई



सोलापूर दि. 12 : कोणत्याही व्यक्तीने त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या वा त्याच्या इतर नातेवाईकाच्या लग्नासाठी कोणत्याही वर्तमानपत्रात, नियतकालिकात किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे त्याच्या संपत्ती,  पैसा किंवा व्यवसायाबाबत जाहिरातीद्वारे प्रस्ताव दिल्यास हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 च्या कलम 4 अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंड्यासंदर्भात जाहिरात छापल्यास, प्रसिध्द केल्यास कमीत कमी सहा महिने पंरतु पाच वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा रुपये 15 हजार इतक्या दंडाची तरतूद आहे.
                      तरी हुंड्याबाबत कोणत्याही प्रकारची जाहिरात वर्तमानपत्रात अथवा कोणत्याही माध्यमाद्वारे देण्यात येऊ नये, असे जिल्हा माहिला बाल विकास अधिकारी, सोलापूर यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment