Friday, August 12, 2016

शेळीगट लाभार्थी निवडीसाठी 19 ऑगस्ट रोजी बैठक



सोलापूर दि. 12 :  जिल्ह्यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अवर्षण प्रवण क्षेत्राची 10 तालुके वगळून फक्त माळशिरस तालुक्यात स्थानबद्ध पध्दतीने संगोपन करण्यासाठी (सर्व प्रवर्गासाठी)  50 टक्के अनुदानावर 40 शेळ्या अधिक दोन बोकड या प्रमाणे 4 शेळीगटाचे वाटप करण्यासाठी दिनांक 19 ऑगस्ट 2016 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक पशुसंवर्धन उप आयुक्त, सोलापूर, कुकुट प्रकल्प आवार, नेहरुनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.   
                     शेळीगट वाटपासाठी इच्छुकांकडून अर्जाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त झालेल्या 53 अर्जाची छाननी करुन प्रत्येक्ष लाभार्थी समोर चिठ्ठ्या टाकून यातील चार लाभार्थीची निवड करण्यात येणार आहे. तरी लाभार्थी निवड प्रक्रिया / सभेस सर्व संबंधितानी उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सोलापूर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment