Wednesday, August 24, 2016

स्वस्त दरात तूरडाळ विक्रीचा शुभारंभ सर्वमसान्यांना परवडणाऱ्या दरात तूरडाळ उपलब्ध : अन्न नागरी पुरवठा मंत्री बापट

पुणे, २४- तूरडाळ ही सामान्य माणसाच्या दैनंदिन खाण्यातील आवश्यक घटक आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात शासनाने तूरडाळ उपलब्ध करुन दिली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
                मार्केड यार्डात औंध येथील रिलायन्स मॉल येथे खुल्या बाजारामध्ये स्वस्त दरात तूरडाळ विक्रीच्या  शुभारंभप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमती ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी  सोनाप्पा यमगर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
                यावेळी पालकमंत्री बापट म्हणाले की, राज्यात गेल्या वर्षी तूरडाळीची उपलब्धता कमी होती. मालाची आवक मागणीनुसारच बाजारातील दर ठरले जातात. त्यामुळे तूरडाळ महाग विकली जात होती. ७० टक्के  तूरडाळ परदेशातून आयात करावी लागते. यावर्षी आवक वाढविली आहे. त्यामुळे खुल्या बाजारामध्ये मॉलमध्येही सर्वसामान्यांसाठी ९५ रु किलो दराने चांगल्या दर्जाची आवश्यक तूरडाळ उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे सांगितले.
यापुढे शेतकऱ्यांना तूरपिक घेण्यांसाठी प्रोत्साहन देण्याबाबत शासनस्तरावर विचार केला जात आहेतसेच तूरीचे अधिक उत्पादन होण्यांसाठी संशोधन केले जात आहे. नविन जात निर्माण केली आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळाले पाहिजे. शेतकरी मजबुत झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या डाळीला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पालकमंत्री बापट यांनी सांगितले.
                याप्रसंगी श्री. बापट यांनी शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध योजनाद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजना, तरतूद याबाबतची माहिती दिली. तसेच तूरडाळीचा साठा कोणीही करु नये. आवश्यकतेनुसार सर्वांना तूरडाळ उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे काही ठराविक व्यापारी, माफीया जनतेची पिळवूणक लूट केल्यास सहन करणार नाही त्यावर कायद्याचा बडगा उगारण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री बापट यांनी दिला.
                प्रारंभी अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमती ज्योती कदम यांनी प्रास्ताविकात खुल्या बाजारामध्ये तूरडाळीची विक्री हा शासनार्फे महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे, चांगल्या दर्जाची डाळ याद्वारे उपलब्ध करुन दिली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
  याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते स्वस्त दरातील तूरडाळ विक्रीचा शुभारंभ्करण्यात आला.
मार्केड यार्ड येथील कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष प्रविण चोरबेले तर औंध येथील कार्यक्रमास आमदार विजय काळे, रिलायन्स रिटेलचे शहर व्यवस्थापक जगदीश पांचोली उपस्थित होते.
राज्यातील जनतेला तूरडाळ स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यांसाठी राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यानुसार पुणे जिल्ह्यांसाठी स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरणांसाठी पुढीलप्रमाणे तूरडाळ उपलब्ध करुन दिलेली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी अन्न धान्य वितरण अधिकारी, पुणे यांच्यामार्फत ,९२३ स्वस्त धान्य दुकानातून ,६१,२५५ बी. पी. एल ६४,६२२ अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांसाठी ,२५५ क्विटंल तूरडाळ उपलब्ध करुन दिलेली आहे.
                तसेच २८ जुलै २०१६ च्या शासन निर्णयानुसार ९५ रु. किलो दराने पुणे पिंपरीचिंचवड शहरातील नागरिकांना डी-मार्ट, बिग बाजार बाजार रिलायन्स फेश यांच्या विविध शाखा, त्याचप्रमाणे गुलटेकडी मार्केड यार्ड, हडपसर सिटी रिटेल (इंडिया) लि. पॅसिफिक मॉलच्या शाखा आदि ४५ ठिकाणी उपलब्ध करुन दिली जात आहे.
००००







No comments:

Post a Comment