Monday, August 29, 2016

पुणे शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी


पुणे दि.29 : पुणे शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रात शांतता व कायदा सुव्यस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 च्या कलम 37(1)(3) अन्वये दि. 27 ऑगस्ट 2016 रोजी 1 वाजल्यापासून ते दि. 9 सप्टेबर 2016 रोजी रात्री 12 वाजेपर्यंतप्रतिबंधात्मक आदेश करण्यात आल्याची माहिती पोलीस सह- आयुक्त सुनिल रामानंद यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांनी अहवालाद्वारे असे कळविले आहे की, पुणे शहरात जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना या मोर्चे, धरणे, निर्दशने बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलनाचे आयोजन करतात शहर परिसरात ठिक-ठिकाणी महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या कार्यवाहीच्या वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा संभव आहे. दि. 5 सप्टेंबर 2016 रोजी गणेश चतुर्थी असून पुणे शहरामध्ये सार्वजनिक मंडळे गणेश स्थापना करुन विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात व घरगुती गणपतीची स्थापना होत असते त्यांचे विर्सजन हे दिड दिवस, तीन दिवस, व पाचव्या दिवशी होत असते. त्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीकोनातून पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीकोनातून दि. 27 ऑगस्ट 2016 रोजी 00.01 वा. पासून ते दिनांक 9 सप्टेंबर 2016 रोजी 24.00 वा. पर्यंत या 14 दिवसांच्या काळात मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 च्या कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येत आहे.
            या 14 दिवसांच्या कालावधीत कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका व शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांच्या चित्रचे, प्रतिमेचे प्रर्दशन व दहन करणे, मोठयाने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे इत्यादी कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.
0 0 0 0


No comments:

Post a Comment