Monday, August 22, 2016

शिष्यवृत्तीसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत

    शिष्यवृत्तीसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत
            सातारा, दि. 22 (जिमाका) :  इयत्ता 10 वी, 12 वी, पदवीका आणि पदवीचे शिक्षण शैक्षणिक वर्ष 2015-16 मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या व पुणे शिक्षण घेत असलेल्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून मंजूर करण्यात येणार आहे.  तरी जिल्ह्यातील माजी सैनिकांनी, विधवांनी आपल्या पात्र पाल्यांचे अर्ज दि.15 ऑक्टोबर 2016 पर्यंत कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर. जाधव यांनी केले आहे.
0000
24 सप्टेंबरला सैन्य भरती
             सातारा, दि. 22 (जिमाका) : 115 इन्फट्री (टी.ए.) महार यांची भरती बेळगाव किल्ला या ठिकाणी सोल्जर जीडी-19 व क्लर्क 1 या पदांची भरती दि.24 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 5 वाजता होणार आहे. या भरतीच्या अधिकच्या माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर. जाधव यांनी केले आहे.
0000
माजी सैनिकांना नोकरीची संधी
सातारा, दि. 22 (जिमाका) :डी.जी.आर रक्षा मंत्रालय, नवी दिल्ली व एअर फोर्स यांच्यावतीने नियुक्तीअधिकारी  मेळावा जॉब फेअर दि.25 सप्टेंबर 2016 रोजी   एअर फोर्स् स्टेशन, लोहगाव, पुणे येथे  आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर. जाधव यांनी दिली आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले रजिस्ट्रेशन www.dgrindia.com www.triviz.com या संकेतस्थळावर करावे. मेळाव्याच्या ठिकाणी त्याच दिवशीही रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त माजी सैनिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.
00000
इन्सपायर ॲवार्ड प्रदर्शन 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान आयोजन
सातारा, दि. 22 (जिमाका) : इन्सपायर ॲवार्ड प्रदर्शन श्रीपतराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, करंजेपेठ, सातारा येथे दि. 29 ते 31 ऑगस्ट 2016 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषेदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देवीदास कुलाळ यांनी दिली आहे.
या प्रदर्शनाची मांडणी दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत करावी. यावर्षी ज्या 333 ॲवार्डी विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. या सर्व 333 ॲवार्डी विद्यार्थी व त्यांच्यासोबत एकच मार्गदर्शक शिक्षकांनी प्रदर्शनासाठी सहभाग नोंदवावयाचा आहे. याशिवाय गतवर्षीच्या प्रदर्शनात ज्या विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये वॉरंट मिळालेले होते, परंतु प्रदर्शनासाठी पूर्वी सहभाग घेतलेला नव्हता अशा विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनात सहभाग घ्यावयाचा आहे, असेही श्री. कुलाळ यांनी कळविले आहे.
0000
27 ऑगस्टला रोजगार मेळावा
सातारा, दि. 22 (जिमाका)जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत श्रीपतराव कदम महाविद्यालय, शिरवळ येथे 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक सुनील पवार यांनी दिली आहे.
  या रोजगार मेळाव्यात एसएससी/एचएससी व आयटीआय (फिटर, वेल्डर, ग्राइंडर, मशिनिस्ट) पास उमेदवार रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये शिरवळ येथील कंपन्या सहभागी होणार आहेत. रोजगार मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर जॉब फेअर (रोजगार मेळावा) यासाठी अप्लाय करावा. आपला युझर आयडी व पासवर्ड वापरुन लॉगीन होऊन जॉब फेअर हा ऑप्शन निवडावा. सातारा जिल्हा निवडून ॲक्शन ऑप्शनमधून पार्टीसिपेशन (सहभाग) नोंदवावा व एंट्री पास प्रिंट करुन घ्यावा, असेही श्री. पवार यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment