पुणे. दि. 16 (विमाका): महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय
संचालनालयाकडून देण्यात येणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ आणि ‘डॉ.
एस. आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय
कार्यकर्ता व सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार’ साठी 10 सप्टेंबर
2016 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी
केले आहे.
राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा
गुणात्मक विकास व्हावा; त्यांना अधिक चांगल्या सेवा
देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी ‘डॉ.
बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय
पुरस्कार’ आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक
ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी
प्रवृत्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ‘डॉ. एस
आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार’ देण्यात येतो.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील “अ” “ब” “क” “ड”
वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये पन्नास हजार
रुपये, तीस हजार, वीस हजार आणि दहा हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व
स्मृतीचिन्ह सन्मानपूर्वक देऊन सन्मानित
करण्यात येते. राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी
पंचवीस हजार रुपये रोख पारितोषिक,
सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावर प्रत्येकी
एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र
व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात येते.
2016-17 च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय,
कार्यकर्ते व सेवकांनी आपले विहीत नमुन्यातीलअर्ज दिनांक 10 सप्टेंबर 2016 पर्यंत दोन
प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत असेही श्री. धांडोरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये
कळविले आहे.
******
No comments:
Post a Comment