Saturday, August 13, 2016

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिजीटल क्लासरुमला राज्यपालांची भेट












सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या
डिजीटल क्लासरुमला राज्यपालांची भेट

            पुणे, दि. 13 – राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अत्याधुनिक सोयींनीयुक्त इ कटेंट स्टुडीओची निर्मिती करण्यात आली आहे. या स्टुडीओला राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज भेट दिली. यावेळी राज्यपालांनी स्टुडीओमधून दृक-श्राव्य माध्यमातून फर्ग्युसन कॉलेज व नाशिक येथील केटीएचएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
            यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्याशी प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी निश्चित केलेल्या कालगणना पध्दतीवर चर्चा केली. या स्टूडीओमध्ये व्यावसायीकदृटया उच्च दर्जाची शॉर्ट फिल्म, डिजीटल नाटके तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पना व शोध निबंध या स्टूडीओद्वारे देशभरात वेगवेगळया ठिकाणी प्रक्षेपित करता येणार आहेत.
            विद्यापीठाच्या डीजीटल क्लासरुमलाह यावेळी राज्यपालांनी भेट दिली. या क्लासरुममध्ये डीजीटायझेशनच्या माध्यमातून व्हिडीओ शिकवणीद्वारे विद्यार्थ्यांना शिकविण्यात येते. संगणकीय प्रणाली वापरुन व्हिडीओ शिकवणी तयार केल्यामुळे त्यामध्ये सोईनुसार बदल करणे, ते संगणकावर साठवणे, ऑनलाईनपध्दतीने आवश्यक संदर्भ माहिती मिळविणे इत्यादी सुविधा यामुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या आहेत. विभागाच्या प्रमुख डॉ.अनघा तांबे, प्रकल्पाचे प्रमुख डॉ.अनिरुध्द जोशी यांनी राज्यपालांना यावेळी प्रात्याक्षिक करुन दाखविले. येथील सायन्स पार्कला भेट देऊन तेथील वैज्ञानिक साहित्यांची पाहणी राज्यपालांनी केली.
            राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्यासमवेत यावेळी कुलगुरु डॉ.वासुदेव गाडे,विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
           
000

No comments:

Post a Comment