Monday, August 15, 2016

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल इन्शुरन्स कंपनी, ससून सर्वोपचार रुग्णालयात सामंजस्य करार संपन्न





राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत
नॅशनल इन्शुरन्स कंपनी, ससून सर्वोपचार रुग्णालयात सामंजस्य करार संपन्न
                पुणे, दि. 15 : नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्यात व्यावसायिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत सामंजस्य करार (MOU) हस्तांतरण कार्यक्रम येथील विधान भवनाच्या सभागृहात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न्झाला.
याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, विभागीय आयुक्त्‍  एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठता श्री. चंदनवाले, नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या ठिकाणी 24 तास रुग्णसेवा दिली जाते. वर्षाला अंदाजे 5 लाख रुग्ण बाहयरुग्ण म्हणून तर आंतरुग्ण म्हूणन अंदाजे 50 ते 60 हजार रुग्ण उपचारासाठी येत असतात. ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांसाठी दैनंदिन सोईसुविधा तात्काळ पुरविल्या जाणे गरजेचे आहे.   
 ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरिब रुग्णांना अद्ययावत सोईसुविधा उपलब्ध होण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णलायाचे अधिष्ठता यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी, पुणे यांच्याकडून देणगी स्वरुपात विविध उपकरणांची मागणी केली होती. त्यानुसार  विभागीय आयुक्त्मा. श्री. एस. चोक्कलिंगम यांच्या पुढाकाराने नॅशनल इन्शुरन्स कंपनी, पुणे यांनी 5 कोटी 18 लाख 80 हजार रुपये किंमतीचे विविध उपकरणे व अद्ययावत शस्त्रक्रियागृहे निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिलेले होते.
            या अनुषंगाने सदर करारनाम्यावर आज  स्वाक्षरी करुन अदान-प्रदान करण्यात आले.

                                                                                    0000

No comments:

Post a Comment