Monday, August 15, 2016

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे प्रतिपादन








सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे प्रतिपादन
सोलापूर दि. 15:- सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य  शासन कटिबध्द असून त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री  विजयकुमार देशमुख यांनी आज  केले.
                         भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झाला, त्यावेळी  ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू आदी उपस्थित होते.
                         पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले,  जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य अशा मुलभूत गोष्टींचा विकास करण्यावर भर आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यासाठी नियोजबध्द पावले उचलीत आहे 
                         पालकमंत्री देशमुख म्हणाले,  शासनाने शेती आणि शेतकऱ्यांना बळ देण्याची भूमिका घेतली आहेजिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणसूक्ष्म सिंचन योजना आणि शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहेतयांत्रिकीकरणाच्या योजनेवर भर देण्यात येत आहेअवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे होणाऱ्या शेतीचे नुकसान टाळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहेशेतकऱ्यांना सुरक्षेचे कवच देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे .
             दुष्काळाची परिस्थिती कायमची बदलण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहेआपल्या जिल्ह्यातील या अभियानाची अंमलबजावणी अतिशय चांगल्या पध्दतीने होत आहे, असे पालकमंत्री  देशमुख म्हणाले.  
                        स्मार्ट सिटी प्रकल्पातून सोलापूर शहरात रस्तेपाणी पुरवठासांडपाणीव्यवस्थापन असे अनेक प्रकल्प राबवले जाणार आहेतयासाठी सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना करण्यात आली आहेप्रकल्पासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्याचे अंतिम टप्प्यात असून सविस्तर प्रकल्प अहवालही तयार केला जात आहे. स्मार्ट सिटी अंतर्गतची कामे पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना दर्जेदार व उत्कृष्ट            सोयी - सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे पालकमंत्री  देशमुख यांनी सांगितले.  
                        पंढरपूरला येणा-या भविकांची सोय व्हावी यासाठी राज्य शासनाने अनेक उपाय योजना आखल्या आहेतपंढरपूर नगरपालिकेचे यात्रा अनुदान पाच कोटी रुपये करण्यात आले आहे, असे सांगुन पालकमंत्री  देशमुख म्हणाले, राज्य शासनाने चंद्रभागा नदीचे शुध्दीकरण करून तीचे पावित्र्य अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत प्राधिकरण स्थापन करून चंद्रभागा नदी स्वच्छ करण्यात येणार आहे.
                       स्वच्छ भारत .... स्वच्छ महाराष्ट्र अभियान उपक्रमाची जिल्हयात प्रभावी आणि परिणामकारकरित्या अंमलबजावणी सुरु आहेनुकतेच जिल्हा परिषदेच्या वतीने कुटुंबस्तर संवाद अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय असावे यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहेया अभियानाच्या माध्यमातून कुर्डुवाडीकरमाळासांगोला, मगळवेढा नगरपालिका हागणदारीमुक्त करण्यात यश आले आहे, असे त्यांनी सांगितले.       
                        राज्यात महात्मा फुले जन - आरोग्य योजना लागू करण्यात येणार असून यामध्ये पूर्वीच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतील विमाछत्र दीड लाखावरून दोन लाखापर्यंत करण्यात आले आहे. पूर्वीच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेत 971 आजारांचा समावेश होता, त्याची संख्या वाढवून आता 1100 आजारांचा या नवीन योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. ही योजना पिवळी, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिका धारकांबरोबरच 14 दुष्काळग्रस्त्‍ा जिल्ह्यांसाठी तसेच शासकीय अनाथाश्रम, शासकीय वृध्दाश्रम, शासकीय आश्रमशाळा व नोंदणीकृत पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील लागू राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.   
                        शासनाने दि. 01 एप्रिल 2016 पासून “ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजना   ही नवीन योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस तात्काळ रूग्णालयात दाखल करून त्याच्यावर विनामुल्य उपचार करण्यात येतात. तसेच मृत प्रवाशांच्या वारसांना 10  लाख रुपये  नुकसान भरपाई देण्यात येते, असे त्यांनी सांगितले.  
                     आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक “ सायबर लॅब  स्थापन करण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतला असून सोलापूर पोलिस आयुक्तालयात सुध्दा अशा प्रकारची सायबर लॅब स्थापन करण्यात आली आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांचा शोध व प्रगटीकरण योग्य पध्दतीने होण्यास मदत होणार असून शासन सायबर क्राईम रोखण्यासाठी कटिबध्द आहे, असे ते म्हणाले.
                     तत्पूर्वी, पालकमंत्री देशमुख यांचे सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आगमन झाले. जिल्हाधिकारी रणजीतकुमार, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी त्यांचे स्वागत केले. पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.  
                      यावेळी समाजाच्या विविध स्तरातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक आणि विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                      तद्नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय इरण्णा हुंडेकरी यांना राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्काराने व मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी या ग्रामपंचायतीस सन 2014-15 चा महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर एनटीएस शिष्यवृत्ती प्राप्त विदयार्थीनी- अश्विनी मकरंद आपटे आणि माजी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये एका मुलींवर कुटुंब नियेाजन केलेल्यांचा सत्कार तसेच क्रीडा विभागाच्या पुरस्कारांचे वितरण ही त्यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा पुरस्कारामध्ये आनंद बाळासाहेब चव्हाण व शरद जगदीश नाईक यांना गुणवंत मार्गदर्शक संघटक, गुणवंत खेळाडू म्हणून कुमार ऋषिकेश अनिल यरगल, रुपाली भागवत यमगर यांचा समावेश आहे. तसेच जिल्हा युवा पुरस्कार ( संस्था) – लोकमंगल कला क्रीडा सांस्कृतिक युवक मंडळ, सोलापूर  –रुपये 50 हजार रोख व मानचिन्ह, युवकांसाठी पुरस्कार – चिंतामणी ज्ञानेश्वर पवार, सोलापूर, युवतीसाठी पुरस्कार – संगीता पंडीत पाटील, सोलापूर  यांना प्रत्येकी रुपये 10 हजार व मानचिन्ह  देऊन गौरविण्यात आले.
                       समारंभास जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, मनपा आयुक्त विजय काळम - पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर, जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभु, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
000000

No comments:

Post a Comment