Tuesday, August 23, 2016

प्रतिबंधात्मक आदेश लागू


            पुणेदि. 23: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने  हवेली तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीमधील 14 रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने त्याची आचार संहिता  लागू केली आहे. शासकीय धन्य गोदाम क्र.सी-6, शिवाजीनगर, पुणे -5 येथे पोटनिवडणुकीचे नामनिर्देश पत्र स्विकारण्याची कार्यवाही व निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. मतदानानंतर मतपेट्या शासकीय गोदामात तयार करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सदरहू ठिकाणीमतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.या सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी पोलीस सह आयुक्त सुनिल रामानंद यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता,1973 च्या कलम 144 अन्वये मतमोजणी पूर्ण होईपर्यत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेतयानुसार  निवडणूकीचे कालावधीत प्रचाराच्या अनुषंगाने कोणत्याही परिस्थितीत एकावेळी तीनपेक्षा अधिक वाहने एका ताफ्यात चालवू नयेत, तसेच दोन ताफ्यातील अंतर हे 15 मिनीटांचे असावे असे आदेश देण्यात आले आहेत. सदरहू आदेश 26 ऑगस्ट,2016 रोजी रात्री 12-00 वाजेपर्यत्‍ अंमलात राहतील.
            सदरचा आदेश संरक्षण वाहनांच्या ताफ्यासह केंद्र किंवा राज्यशासनाचे मंत्री किंवा उच्च पदस्थ व्यक्‍ती घेवून जात असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेविषयी लागू असलेल्या आदेशास  अधिन राहून अंमलात राहिल व शासकीय कामावर असलेल्या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.  संबंधीत कोणतीही व्यक्ती ते ज्या वॉर्डाचे मतदार नाहीत त्या वॉर्डात थांबण्यास/वास्तव्य करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहेसदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भादवि कलम 188 नुसार शिक्षेस पात्र ठरेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000


No comments:

Post a Comment