Saturday, August 27, 2016

स्त्री शक्तीच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

सोलापूर दि.27 : -  राज्याच्या  विकासात स्त्रीयांचे योगदान मोलाचे आहे. त्यांना बळ देण्यासाठी शासन सक्षम आहे. स्त्री शक्तीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही महिला व बालविकास, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
                     सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत  जिल्हयातील ग्रामीण भागातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्ग्त उत्कुष्ट कार्य केलेल्या अंगणवाडी सेविका पारितोषिक  वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.
                    यावेळी  व्यासपीठावर जि..मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, जि..अध्यक्षा जयमाला गायकवाड, .बबनदादा शिंदे, जि..उपाध्यक्ष शहाजी देशमुख, सभापती ॲड,सुकेशिनी देखमुख, कल्पना निकंबे-क्षीरसागर, मकरंद निंबाळकर, अप्पाराव कोरे, शिवानंद बिराजदार, आदी मान्यवर उपस्थित होते.
        त्यापुढे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधन मिळावे यासाठी शासनाने सुमारे 228 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. भविष्यात मुलींना कौशल्य शिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी  10 हजार रुपयांची तरतूद केली जाईल. स्त्रीयांनी स्त्री जन्माचे स्वागत करावे, त्याचबरोबर स्वच्छता अभियान प्रभावीपणाने राबवावे, असे आवाहन करुन आरोग्य विभागात जि..मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
         जि..अध्यक्षा जयमाला गायकवाड म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांना मानधन वाढून मिळावे, त्याचबरोबर महिला बाल विभागाने कराटे प्रशिक्षणासाठी निधी द्यावा, अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त्केली. तर ॲड,सुकेशिनी देखमुख म्हणाल्या की, ग्रामविकासात स्त्रीयांची भूमिका महत्वाची आहे. जिल्हयात सुमारे 3 हजार अंगणवाडया डिजीटल करण्यात आल्या आहेत. महिला व बाल विकास विभागाने सोलापूर जिल्हयात आणखीन नवीन अंगणवाडयांना मंजूरी द्यावी. अशी मागणी प्रास्ताविकात केली.
          निर्मिती लाँन्सच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सन 2015-16 2016-17  या वर्षात उत्कृष्ट कार्य केलेल्या 244 अंगणवाडी कर्मचा-यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी शहाजी पवार, वसंतराव देशमुख, जि..बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत यांच्यासह जिल्हयातील हजारो अंगणसेविका उपस्थित होत्या.

                                                  0 0 0 0 

No comments:

Post a Comment