Friday, August 26, 2016

प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

              
            सातारा, दि. 26 (जिमाका) :  राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 करिता प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे, अशी माहिती नोडल ऑफीसर तथा उपजिल्हाधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक यांनी दिली आहे.
            प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे. प्रारुप प्रभाग रचना आरक्षणासह प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीकरिता आरक्षणासह विभागीय आयुक्तांकडे सादर करणे जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागामध्ये व पंचायत समिती क्षेत्राची निर्वाचक गणामध्ये विभागणी करुन यावर जिल्हाधिकारी 9 सप्टेंबर 2016 पर्यंत कार्यवाही करतील. प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त 23 सप्टेंबरपर्यंत करतील. जिल्हाधिकारी 28 सप्टेंबरपर्यंत आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करतील.
            आरक्षणाची सोडत काढणे : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील/ सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी तहसीलदार 5 ऑक्टोबर रोजी कार्यवाही करतील. प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना (निवडणूक विभाग/ निर्वाचक गण रचना व आरक्षणासह) जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2016 रोजी प्रसिद्ध करतील.

            जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी 10 ते 20 ऑक्टोबर 2016 राहील. 17 नोव्हेंबरपर्यंत विभागीय आयुक्त प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी देऊन निवडणूक विभाग/ निर्वाचक गण रचना अंतिम करतील. जिल्हाधिकारी 25 नोव्हेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना व आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्धी करतील.
00000

No comments:

Post a Comment