Friday, August 26, 2016

अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम करुन शासनाची प्रतिमा उंचवावी --- एस. चोक्कलिंगम्




पुणे. दि. 26 (विमाका): अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम करुन शासनाची प्रतिमा उंचवावी, असे मत विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी आज येथे व्यक्त केले.
पुणे महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विभागीय स्तरावरील सत्कार समारंभ श्री. चोक्कलिंगम् यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अप्पर आयुक्त श्याम देशपांडे, पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सोलापूर व सांगली  जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी अनुक्रमे सौरभ राव, अश्विन मुदगल, रणजित कुमार, शेखर गायकवाड हे उपस्थित होते.
श्री. चोक्कलिंगम् म्हणाले, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करतांना प्रत्येक काम चोखपणे पार पाडावे. कुटुंबाला वेळ देण्याबरोबरच स्वत:चे आरोग्यही जपावे. तसेच आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रयत्न करावेत.
कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी संजय तेली, पंढरपूर, जि. सेालापूर,  तहसीलदार आर.बी. पोटे, दक्षिण सोलापूर, नायब तहसीलदार व्ही. बी. चौबे, तहसिल कार्यालय, उत्तर सोलापूर, अव्वल कारकुन जे.बी. वीर, उपविभागीय अधिकारी कार्यालय, सातारा,  मंडळ अधिकारी सुभद्रा आनंदराव कुंभार, कुची, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली,  गणेश डुबे, लिपिक, महसूल शाखा, पुणे, श्रीमती. राजश्री शिवपुत्र पचंडी, तलाठी, सजा दुडंगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, श्री. भगवान रामचंद्र पाटील, पोलीस पाटील, सवते, ता. शाहुवाडी,      जि. कोल्हापूर, श्रीमती. येल्लेमती हिकमती नाईक, कुडनूर, ता. जत, जि. सांगली यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुणे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000



No comments:

Post a Comment