Monday, August 15, 2016

पारगाव येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन



पारगाव येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन
            सातारा, दि.15 (जिमाका): खंडाळा तालुक्यातील पारगाव या गावी जलयुक्त शिवार अभियनातून बांधण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्यात  साठलेल्या पाण्याचे पूजन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या  हस्ते आज करण्यात आले.  
                जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्यात  31.67 स.घ.मी. पाणी साठा झाला आहे. या साठवण बंधाऱ्यावर 12 लाख 57 हजार 967 रुपये खर्च करण्यात आलेला आहे.
                पारगाव येथील साठवण बंधारा सध्या पाण्याने भरुन वाहत आहेत. आज या बंधाऱ्यातील जलपुजन पालकमंत्री विजय शिवतारे  यांच्या   हस्ते आज करण्यात आले.  या प्रसंगी  प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार शिवाजी तळपे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, गटविकास अधिकारी दिपा बापट,  लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रा. घ. इसवे, उपअभियंता पी.बी. शिवदास, तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद मांगले, सरपंच अश्विनी पवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment