Tuesday, August 16, 2016

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे 18 ऑगस्ट रोजी वितरण


    पुणे,दि.16: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण  पुरस्कार देण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जंयतीनिमित्त या  पुरस्कारास विशेष महत्व आहे.
          हा पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार, 18 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11-00वा. महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी पुणे येथे संपन्न होत आहेमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री ना. राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे.
महाराष्ट राज्यातील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण व शारीरीक आणि मानसिक दुष्टया अपंग, कृष्ठरोगींसाठी व समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणा-या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव करावा, सामाजिक क्षेत्रात काम करीत असलेल्या समाजसेवकांच्या कामाचे कौतुक करावे व कार्यकर्त्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी शासनाने सदरहू पुरस्कार योजना सुरु केली आहे.
स्वयंसेवी सामाजिक संस्थांनासुध्दा सन 1989 पासून दलित मित्र पुरस्कार सुरुवात झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारचे स्वरुप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मान पत्र आणि रोख  रुपये पंधरा हजार  प्रती व्यक्तीस व संस्थेसाठी रोख रुपये पंचवीस हजार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सदरचा  पुरस्कार 51 व्यक्ती  आणि 10 संस्थांना देण्यात येतेा. या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्ा विभाग राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हापरिषद अध्यक्ष प्रदिप कंद, महापौर प्रशांत जगताप, जिल्हयातील सन्माननीय लोकसभा व विधान सभा सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सर्वानी  या  पुरस्कार  सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन समाज कल्याण आयुक्त पियूष सिंह यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment