Friday, August 19, 2016

माझी कन्या भाग्यश्री योजना प्रभावीपणे राबवावी :महिला बालकल्याण मंत्री मुंडे

पुणे,  दि. 19 :’ माझी कन्या भाग्यश्री योजनेद्वारे स्वता:च्या पायावर उभी राहणारी सज्ञान मुलगी घडणार आहे यासाठी  सदर योजनेची गांर्भीयांने प्रभावीपणे राबवावी असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास  महिला बालकल्याण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
 येथील यशदाच्या सभागृह महिला,बालविकास विभागाच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होत्या, यावेळी महिला बाल विकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर, महिला बालकल्याण विभागाचे अपर मुख्यसचिव संजयकुमार,महिला बालकल्याण आयुक्त श्रीमती विनीता सिंघल याची प्रमुख उपस्थिती होती.
 यावेळी बोलताना श्रीमती मुंडे म्हणाले की माझ्या घरात येणारी कन्या ही भाग्यश्रीच आहे. तिचे स्वागत घरानी, गावांनी, जिल्हृयानी, राज्यांनी  केले पहिजे. केंद्र शासनाने मुली  वाचविण्या बरोबर शिकविलेही पहिजे यासाठीबेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना सुरु केली. राज्य शासनाने ही मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे. घरातुन, समाजातून मुलीला ताकद मिळाली पाहिजे या साठीमाझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरु केली असल्याचे सांगितले .
सदरची योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी  अंगणवाडी स्तरावर बैठक घेण्यात यावी. तसेच विविध माध्यमाद्वारे,प्रसिद्वी साहित्यचा वापर करुन  प्रभावी जनजागृती आणि प्रबोधन करावे, 2 ऑक्टोबर ते 14 नोंव्हेबर च्या कालावधीत यासाठी विविध कार्यक्रम, स्पर्धाचे आयोजन करुन लोकसहभाग वाढवावा. 14 नोंव्हेबर रोजीबालिका दिन’  कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या   मुंडे  यांनी दिल्या .
राज्यातील अंगणवाडी सशक्त स्मार्ट झाली  पहिजे यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. अंगणवाडीचा अभ्यासक्रम तयार केला जात आहे. नवीन तंत्रज्ञान वापरून राज्यात चार हजार अंगणवाड्या बांधण्याचा मनोदय  श्रीमती  मुंडे  यांनी व्यकत्केला .
याप्रसंगी श्रीमती  मुंडे यांनीमाझी कन्या भाग्यश्री’ योजनेबाबत सविस्तर चर्चा करून उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला .तसेच सदर योजनेबाबत संकल्पना समजावून सांगून शंका,अडचणीचे निरसन केले. त्याचप्रमाणे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या .
यावेळी महिला बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांनी मुले मुलीचे जन्मदरा च्या गुणोत्तराचे  प्रमाण हे सामाजिक दृष्ट्या महत्वाचा विषय आहे .केंद्र शासनानेही हा विषय गांर्भीयाने घेतला आहे.भृणहत्या रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. भृणहत्या रोखून मुलीचा जन्म झाला पाहिजे त्यासाठीचमाझी कन्या भाग्यश्रीयोजना सुरू केली असल्याचे सांगितले.
प्रारंभी महिला बालकल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांनी , महिला बालविकास विभागांनी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच नविन तंत्रज्ञानाचा  वापर करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
00000



No comments:

Post a Comment