Thursday, August 25, 2016

नवोदय विद्यालय प्रवेशाबाबत आवाहन


सोलापूर दि. 25 : -  इयत्ता 5 वीत शिकत असलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयात प्रवेश द्यावयाचा आहे यासाठी दिनांक 8 जानेवारी 2017  रोजी परिक्षा घेण्यात येणार आहे. ही परिक्षा देवू इच्छिणाऱ्या पाल्यांच्या पालकांनी तसेच पाल्यांनी या परिक्षेबाबत निवड चाचणीसाठी अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत 16 सप्टेंबर 2016  पर्यंत संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावेत.
                   हे अर्ज शिक्षणाधिकारी माध्यमिक, संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालय तसेच ज्या ठिकाणी इ. 5 वी पर्यंत शाळा असलेले मुख्याध्यापक, जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापूर ता.मोहोळ, या ठिकाणी मोफत मिळतील त्याचबरोबर http://www.nvshq.org या वेबसाईटवरही अर्ज  उपलब्ध आहेत. तसेच इच्छुकांनी 02189- 232538 या दूरध्वनीवर संपर्क साधावा,  असे आवाहन प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापूर यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
00000

1 comment: