Saturday, August 20, 2016

सुधारित बीज भांडवल
योजनेसाठी उद्या मुलाखती

सोलापूर  दि.20 :-  सुधारित बीजभांडवल योजनेचा लाभ देण्यासाठी उद्या सोमवार (ता.22) आणि मंगळवार (ता.23)  रोजी मुलाखती आयोजित केल्या आहेत. होटगी रस्त्यावरील जिल्हा उद्योग केंद्रात उद्योग निरीक्षक मुलाखती घेतील. संबंधित अर्जदारांनी मुलाखतीला येताना मूळ कागदपत्रे आणावीत.  
                      सोमवारी मंगळवेढा,माढा,करमाळा,मोहोळ आणि पंढरपूर येथील अर्जदारांच्या मुलाखती होतील. सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत तर दुस-या दिवशी मंगळवारी  याच वेळेत सांगोला,माळशिरस,अक्क्लकोट,दक्षिण आणि उत्तर सोलापूर या तालुक्यांतील अर्जदारांच्या मुलाखती होतील. सुधारित बीजभांडवल योजनेत शेतीपूरक उद्योगांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी 0217-2605232 या दूरध्वनी क्रमांकावर  संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर यांनी केले आहे.
                                                                     0 0 0 0
                             

No comments:

Post a Comment