Tuesday, August 23, 2016

प्रोफेशनल बंदोबस्त व्हावा -पोलीस आयुक्त सेनगावकर


सोलापूर दि. 23 -  भारताचे महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा दिनांक 4 सप्टेंबर 2016 रोजी संभाव्य दौरा असून या दौ-यादरम्यान पोलीस  विभागामार्फत प्रोफेशनल बंदोबस्त करण्यासाठी सर्व अधिका-यांनी आतापासूनच सतर्क रहावे, असे निर्देश पोलीस आयुक्त् रवींद्र सेनगावकर यांनी दिले.
                           राष्ट्रपतींच्या दौ-याच्या अनुषंगाने पोलीस विभागातील प्रमुख अधिकारी तसेच संयोजक यांची आढावा बैठक पोलीस आयुक्तांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
                           ते पुढे म्हणाले की, राष्ट्रपती महोदयांच्या आगमन ते निर्गमनापर्यंत संबधित अधिका-यांनी अलर्ट राहून आपली भूमिका चोखरित्या पार पाडावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तारतम्य बाळगावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
                       या बैठकीसाठी  निवासी उपजिल्हाधिकारी  अजित रेळेकर, मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त्नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त्पौर्णिमा चौगुले-श्रृंगी, अर्पणा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त्शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त्महिपती इंदलकर, महेश जोशी, अग्निशामक दलाचे केदार आवटे, प्रांताधिकारी शहाजी पवार, माजी खा. धर्मण्णा सादूल, माजी . प्रकाश यलगुलवारसुधीर खरटमल, लक्ष्मण चलवादी, विलास मोरे, चेतन नरोटे यांच्यासह पोलीस दलाचे इतर  अधिकारी उपस्थित होते.
            

                                                                0 0 0 0

No comments:

Post a Comment