Friday, August 12, 2016

ट्रॅक्टर व कृषि औजारासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत



सोलापूर दि. 12 : राष्ट्रीय कृषि विस्तार तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान सन 2016-17 अंतर्गत शेतक-यांना ट्रॅक्टर अन्य औजारे पुरविण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र इच्छुक शेतकऱ्यांनी दिनांक 20 ऑगस्ट 2016 पर्यंत कृषि सहाय्यकामार्फत संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment