Friday, August 12, 2016

घरगुती वापराचे केरोसीनच्या दरात सुधारणा


सोलापूर दि. 12 :   शासनाने घरगुती वापराच्या केरोसीनच्या दरामध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे सोलापूर शहरात दिनांक 1 ऑगस्ट 2016 पासून केरोसीनचा प्रति लीटर 15 रुपये 80 पैसे असा नवीन दर झाला आहे. यापूर्वी हा दर प्रति लीटर 15 रुपये 60 पैसे असा होता. तरी सोलापूर शहरातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न धान्य वितरण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment