सोलापूर दि. 12
: ग्रंथालय संचालनालयामार्फत सन
2016-2017 मध्ये देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार
आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट
ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक
ग्रंथमित्र पुरस्कारासाठी ग्रंथालय
व कार्यकर्ते - सेवकांनी प्रस्ताव 10 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्हा
ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर
करावेत.
राज्यातील
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक
विकास व्हावा, त्यांना अधिक
चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन
मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि
ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या
सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता
व सेवक यांना अधिक चांगल्या
सेवा देण्यासाठी प्रवृत्त
व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहन
मिळावे म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट
ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक
ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो.
राज्यातील
शहरी व ग्रामीण विभागातील
अ,
ब,
क आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक
ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये 50 हजार, रुपये 30 हजार, रुपये 20 हजार आणि
रुपये 10 हजार रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह आणि उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक
यांना प्रत्येकी 15 हजार रोख
पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे
पुरस्काराचे स्वरुप आहे असल्याचे, जिल्हा
ग्रंथालय अधिकारी द. आ. क्षीरसागर यांनी कळविले
आहे.
000000
No comments:
Post a Comment