सोलापूर दि. 11 - महसूल आठवड्यानिमित्त महिला खातेदारांसाठी
जिल्ह्यात विशेष मोहिम 1 मे 7 ऑगस्ट या
कालावधीत राबविण्यात येत होती. या मोहीमेस मिळालेला प्रतिसाद
पाहून ही मोहीम 15 ऑगस्ट 2016 पर्यंत
राबविण्यात येणार आहे. या कालावधीत महिला खातेदारांसाठी गाव
पातळीवर मेळावे घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व त्यांचे सक्षमीकरण
करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या विशेष
मोहिमेत कृषी, सहकार, महिला व
बालकल्याण यासह शासनाच्या विविध विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या
योजनांची माहिती देणे, महसूल विभागाविषयी निगडित असणाऱ्या
महिला खातेदारांच्या समस्या, अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे
त्याच ठिकाणी निराकरण करण्यात येणार आहे.
या
विशेष मोहिमेमध्ये जास्तीत जास्त महिला खातेदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन
जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment