Thursday, August 11, 2016

ध्वजसंहितेचे पालन करण्याचे निवासी उपजिल्हाधिका-यांचे आवाहन


             सोलापूर दि. 6 :  केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजास मान्यता नाहीत्यामुळे या राष्ट्रध्वज निर्मितीस व विक्रीस मान्यता नाही. तसेच राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकून देऊ नयेतराष्ट्रध्वज खराब आढळल्यास अथवा झाल्यास तो ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करण्यात यावा.
            राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, त्याची विटंबना होणे हे बोधचिन्ह व नांवे (अनुचित वापरास प्रतिबंध ) अधिनियम 1950 व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम, 1971 तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे. त्यामुळे संबंधितांनी  राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा तसेच प्लॅस्टीकचे ध्वज वापरू नयेत तसेच ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन  निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकान्वये केले आहे.

00000

No comments:

Post a Comment