सोलापूर दि. 11 :- अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब
योजनेअंतर्गत सोलापूर ग्रामीण भागासाठी माहे सप्टेबर 2016 गहू व तांदळाचे नियतन मंजूर
करण्यात आले आहे. मंजूर करण्यात आलेल्या धान्याचे परिमाण पुढीलप्रमाणे-
अंत्योदय अन्न योजने
अंतर्गत - सोलापूर (MIDC CHINCHOLI) 354 मे.टन गहू व 550
मे. टन तांदूळ 218 मे.ब्न, पंढरपूर ( MSWC) 370 मे. टन गहू , कुर्डुवाडी (FCI) 229 मे. टन गहू, तर तांदूळ 126
मे.टन तर कुर्डुवाडी (MSWC Talawade) 500 मे. टन गहू तर तांदुळ 375 मे. टन इतके
नियतन मंजूर करण्यात आले आहे.
प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत - सोलापूर (MSWC)
1141 मे. टन गहू, 992 मे.टन गहू तर
तांदूळ 500 मे.टन तांदूळ 218 मे.टन, पंढरपूर ( MSWC) 1300 मे. टन गहु
व 1614 मे. टन तांदूळ, कुर्डुवाडी (FCI) 1381 मे. टन गहू तर 857 मे. टन तांदूळ कुर्डुवाडी (MSWC
MIDC) गहू 1000 मे.टन तर तांदूळ 1020 मे.
टन तर कुर्डुवाडी (MSWC Tandawale) गहू 500
मे. टन इतके धान्य वितरित करण्यात येणार आहे.
या सप्टेंबर 2016
धान्याच्या उचलीस दिनांक 31 ऑगस्ट 2016 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. वरील
धान्याची उचल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर व उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी, अकलूज यांनी वाहने अधिगृहित केलेल्या वाहनांद्वारे धान्याची उचल मुदतीत
पूर्ण करण्याची दक्षता संबंधित तहसिलदार यांनी घ्यावी. तसेच धान्याचे वितरण मंजूर
प्रमाणानुसारच व्हावे प्रमाणापेक्षा जास्त धान्य वितरित होणार नाही याची काळजी
संबंधितांनी घ्यावी. अपात्र लाभार्थी, बोगस शिधापत्रिकाधारक किंवा एका
शिधापत्रिकेवर दुबार किंवा त्यापेक्षा जास्त धान्य देण्यात येऊ नये. धान्याचा
अपहार किंवा गैरमार्गाने विल्हेवाट लावली जाणार नाही याची दक्षता तहसीलदारांनी
घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर कार्यालयाच्यावतीने करण्यात आले
आहे.
00000
No comments:
Post a Comment