Friday, August 12, 2016

स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

सातारा, दि. 12 (जिमाका ) : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्र ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हयाचे पालकमंत्री विजय शिवतारे  यांच्या हस्ते होणार असल्याची  माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी दिली आहे.
                भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69  व्या वर्धापन दिनाच्या या मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण समारंभास जिल्ह्यातील नागरिकांना उपस्थित राहता यावे यासाठी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 ते 9.35 दरम्यान ध्वजारोहणाचा इतर कोणताही शासकीय वा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये.  इतर शासकीय कार्यालये संस्थांनी त्यांचा ध्वजारोहण समारंभ सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 वाजल्यानंतर आयोजित करावा.  जास्तीत जास्त नागरिक, अधिकारी - कर्मचाऱ्यांनी, तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाच्या या सोहळयास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपस्थित हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment