Friday, August 12, 2016

हुंड्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केल्यास प्रतिबंधात्मक कार्यवाही


                सातारा, दि. 12 (जिमाका ) :  हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 चे कलम 4-अ मधील तरतुदींचा भंग करणाऱ्या वृत्तपत्र आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा व बाल विकास अधिकारी एस.व्ही. शिंदे यांनी दिली आहे.
                हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 चे कलम 4-ए मधील तरतुदींचा भंग करणाऱ्या वृत्तपत्र आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींवर प्रतिबंधात्मक कार्यवाहीची तरतूद आहे.  जाहिरात बंदी-हुडा प्रतिबंधक कायदा 1961 चे कलम 4-अ अन्वये कोणत्याही व्यक्तींने हुंड्यासंदर्भात जाहिरात छापल्यास किंवा प्रसिद्ध केल्यास कमीत कमी 6 महिने ते 5 वर्षापर्यंत मुदतीचा कारावास किंवा 15 हजार रुपयापर्यंत दंडाची शिक्षा करण्याची तरतुद आहे, असेही श्री. शिंदे यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment