सातारा, दि. 12 (जिमाका ) : रुग्णांना
कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच तज्ञ डॉक्टरांच्या सेवा मिळाव्यात फिजीशयन (भिषक)
यांची अर्हताधारक उमेदवाराची तात्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी आरोग्य उपसंचालक यांच्याकडे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना या
रुग्णालयातील रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच तज्ञ डॉक्टरांच्या
सेवा मिळाव्यात म्हणून स्थानिकस्तरावरील खासगी फिजीशयन (भिषक) यांची यादी सपूर्त
करुन त्यांच्या आदेशान्वये दररोज 2 तास फिजीशयन (भिषक) उपलब्ध झाला तरी या
रुग्णालयाचे दैनंदिन कामकाज सुरळीत होईल म्हणून त्यांच्यास्तरावरुन कार्यवाही
होण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. तसेच तज्ञ डॉक्टरांच्या सेवा मिळाव्यात फिजीशयन
(भिषक) यांची अर्हताधारक उमेदवाराची तात्काळ नियुक्तीसाठी उपसंचालक आरोग्य सेवा,
पुणे यांच्याकडे विनंती करण्यात आलेली आहे, असेही डॉ. भोई यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment