मुंबई, दि. 10 : जागतिक आदिवासी दिना निमित्त प्रकाशित करण्यात आलेला `लोकराज्य` आणि `महाराष्ट्र अहेड` या मासिकांचा आदिवासी विकास विशेषांक उल्लेखनीय आणि संदर्भमूल्य असलेला आहे, असे गौरवोदगार आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी आज येथे काढले. मंत्रालयात श्री. सवरा यांच्या दालनात लोकराज्य टीमचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. सवरा बोलत होते.
राज्यातील आदिवासी बांधवांसाठी शासनाकडून केलेल्या उपाययोजना,आदिवासींचा विकास, संस्कृती यांचा समावेश असलेला ऑगस्ट महिन्याचा लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेड या मासिकांचा विशेषांक माहितीपूर्ण आणि देखणा झाला आहे, असे श्री. सवरा यांनी येथे सांगितले. या दोन्ही अंकांच्या उत्कृष्ट निर्मिती बद्दल श्री. सवरा यांनी लोकराज्यच्या संपादकीय चमुतील सहकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.
श्री. सवरा यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक देवेंद्र भुजबळ, उपसंचालक सुरेश वांदिले, वरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकर, प्रवीण टाके, सहायक संचालक क्रिती लाला,उपसंपादक राजाराम देवकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि अभिनंदन पत्र देऊन कौतुकही केले. यावेळी श्री. सवरा यांचे खाजगी सचिव कल्याण अवताडे, आदिवासी विकास विभागाच्या संपर्क अधिकारी काशिबाई थोरात आदी उपस्थित होते.
०००
No comments:
Post a Comment