Wednesday, August 10, 2016

सामाजिक विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल


सातारा दि. 11 (जिमाका):  सामाजिक विकासाच्या दृष्टीने शासनाने आपल्या‍ विविध योजनांची सुरुवात केली आहे. सर्व सामान्य व्यक्तीचा आर्थिकस्तर यातून उंचावला जावा. हा उद्देश आहे. आर्थिक विकासासाठी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांनी केले.
नाबार्डच्यावतीने तसेच बँक ऑफ महाराष्ट्रच्यावतीने आज जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यावेळी श्री. मुद्‌गल बोलत होते. या कार्यशाळेला आयडीबीआयचे प्रबंधक अनील गोडबोले, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात, अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक वृषाली सोने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल पुढे म्हणाले, शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी अशा कार्यशाळा होणे हे खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर या योजनांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होणे ही अत्यंत महत्वाची आहे. या योजनांमधूनच सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बळकटीकरण होणार आहे. जोपर्यंत त्यांचा आर्थिकस्तर उंचावत नाही तोपर्यंत सामाजिक आर्थिकस्तर उंचावणार नाही. देशाचे सामाजिक विकासाच्या दृष्टीने समाजाचा आर्थिक विकास होणे अत्यंत महत्वाचे आहे. त्या दृष्टीने खासकरुन कृषी आणि उत्पादक क्षेत्रामध्ये विशेष काम करावे. विविध योजनांच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये खूप चांगला आर्थिक विकास होवून जिल्ह्याचा विकास होवू शकतो. त्यासाठी सर्वांनी सहानुभूतीपुवर्क लोकांना सुविधा द्याव्यात, असेही ते शेवटी म्हणाले.
नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुबोध अभ्यंकर यांनी यावेळी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
चांदक-गुळुंब ओढा जोड यशस्वी प्रकल्पाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन
         बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात यांनी आपल्या मनोगतात वाई तालुक्यातील चांदक-गुळुंब ओढा जोड प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, 1130 मिटर लांबीचा देशा रोल मॉडेल ठरणारा हा प्रकल्प जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल यांनी यशस्वी करुन दाखविला आहे. पाण्याविषयी असणारी त्यांची तळमळ आणि त्यांचा सामाजिक दृष्टीकोन यातूनच असा प्रकल्प साकारला आहे. या यशस्वी प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल यांचे त्यांनी  यावेळी विशेष अभिनंदन केले.

00000

No comments:

Post a Comment