Wednesday, August 10, 2016

उजनी धरणातून खरीपासाठी सहा टीएमसी पाणी सोडणार मुंबईतील बैठकीत निर्णय

सोलापूर दि.10 : -  उजनी धरणातून खरीपासाठी सहा टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
                        जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली  आज मुंबईत बैठक झाली. त्याबैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री विजय  देशमुख यांनी उजनी धरणातून  एक आवर्तन देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. याचबरोबर भीमा-सीना जोड कालवा एक टीएमसी, सीना-माढा उपसा सिंचन योजना आवर्तन 0.80 टीएमसी असे एकूण 7.80 टीएमसी  पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या आवर्तनाची तारीख नंतर जाहिर केली जाणार आहे.
                     सोलापूर जिल्हयातील नवीन उपसा सिंचन योजनांची चाचणी घेण्यासाठी दहिगाव (चाचणी)-0.2 टि.एम.सी., बार्शी (चाचणीसह) – 0.4 टि.एम.सी., आष्टी-.02 टि.एम.सी., शिरापूर (चाचणी)-0.2 टि.एम.सी., असे एकूण 1 टि.एम.सी. पाणी सोडण्यात येणार आहे, असाही निर्णय घेण्यात आला.
                                                        0 0 0 0

No comments:

Post a Comment