Wednesday, August 10, 2016

शिधापत्रिका धारकांनी आधार क्रमांक रास्तभाव दुकानदारांकडे जमा करावेत -नीलप्रसाद चव्हाण


सातारा, दि.10 (जिमाका) : सर्व पीकेएल, एपीएल, शुभ्र, शिधापत्रिका धारकांनी  त्यांचे आधार क्रमांक रास्तभाव दुकानदार यांचेकडे 12 ऑगस्ट 2016 पर्यंत जमा करावेत, असे आवाहन तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी केले आहे.
 अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दिनांक 3 फेब्रुवारी 2015 रोजीच्या पत्रान्वये सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्यासाठी आधार क्रमांक, बँक खाते नोंदणी करण्याबाबतचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या अनुषंगाने सातारा तालुक्यातील शिधापत्रिका डाटा एंट्री  पुर्ण करण्याचे काम चालू आहे.  ज्या शिधापत्रिकेमधील सदस्यांनी अद्यापही आधार कार्ड नंबर दिले नाहीत, अशा सर्व शिधापत्रिकेतील सदस्यांची यादी सर्व गावकामगार तलाठी यांच्यामार्फत चावडीवर प्रसिध्द करण्यात आली आहे. 12 ऑगस्ट पर्यंत आधार क्रमांक रास्तभाव दुकानदारांकडे न दिल्यास सदरचे लाभार्थी हे दुबार, मयत अथवा स्थलांतरीत आहेत असे समजुन त्यांची नावे  शिधापत्रिकेतून वगळण्यात येतील याची नोंद घ्यावी, असेही आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment