पुणे दि. 9 : कौशल्य विकास कार्यक्रमास व्यापक स्वीकृती देण्यासाठी अभियान सुरु करावे. सामाजिक परिवर्तन आणण्यासाठी अभियानाशिवाय दुसरा उपाय नाही. स्कील गॅप भरुन काढण्यासाठी नियोजन करावे. कौशल्य व उद्योजकता विकास विभागाच्या योजनांचा प्रचार
मोठया प्रमाणात होणे आवश्यक
आहे.
त्याकरिता आवश्यक तो प्रस्ताव
जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर
करावा. त्यासाठी निधी उपलब्ध
करुन देण्यात येईल. पंचायत समिती, जिल्हा
परिषद, आयटीआय येथे फ्लेक्सबोर्ड स्वरुपात
प्रसिध्दी द्यावी अशा सूचना
जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
नुकत्याच आयोजित जिल्हा कौशल्य
विकास कार्यकारी समितीच्या बैठकीत
केले.
पुढे ते म्हणाले, स्कील गॅप स्टडीबाबत एन.एस.डी.सी.ने केलेल्या
सर्व्हेनुसार 28 लाख उमेदवारांसाठी जॉब
आहेत. याबाबत स्कील गॅप नुसार
विविध शासकीय खात्यांच्या बरोबर
बैठका घेऊन नियोजन करणे
आवश्यक आहे. विविध सेक्टरकरिता
स्वतंत्र बैठक घेणे आवश्यक आहे. रोजगार स्वयंरोजगार निर्मितीसाठी
स्वयंसेवी संस्थांची स्वतंत्र कार्यशाळा
आयोजित करावी. उद्योगांसाठी आवश्यक
कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी उद्योग समूहांना प्रशिक्षण संस्था म्हणून सूचीबध्द
करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
प्रमोद महाजन
'कौशल्य
व उद्योजकता विकास अभियान' या योजनेची माहिती
सदस्य सचिवांनी यावेळी बैठकीमध्ये
दिली.
यावेळी प्रकल्प
संचालक दिनेश डोके, समितीतील शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी आदी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment