Tuesday, August 9, 2016

कन्यागत महापर्वकाल निमित्त सातारा विभागामार्फत ग्रुप बुकींग सुविधा


सातारा, दि.9 (जिमाका) : कन्यागत महापर्वकाल निमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी व औदुंबर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी एस.टी.च्या सातारा विभागाकडून ग्रुप बुकींगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सातारा विभागातील सर्व 11 आगारामध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी दिली आहे.
 ही बस संबंधित गावातून सोडली जाणार असून विशेष म्हणजे या जादा गाडीस कोणतेही जादा शुल्क आकारले जाणार नाही. नियमीत तिकीटावर हा प्रवास भाविक प्रवाशांना करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक आगारातील बसस्थानकावर ग्रामस्थांनी आपली मागणी नोंदवावी. ज्या गावात 40 पेक्षा अधिक भाविक श्री क्षेत्र नृसिंहवाडी व औदुंबर येथे जावू इच्छितात त्यांच्यासाठी ग्रुप बुकिंगची सुविधा असणार आहे. ग्रामस्थ एकत्र येवून त्यांनी एस.टी.च्या आपल्या परिसरातील आगाराकडे बसची मागणी करावयाची आहे. ग्रामस्थांनी प्रवासाची तारीख आणि वेळ आगाराकडे दिल्यानंतर तात्काळ गाडी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. जादा गाड्यांसाठी कोणतेही जादा शुल्क असणार नाही. गावापासून ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी व औदुंबरपर्यंत जे तिकीट असेल तेच तिकीट आकारले जाईल. ग्रामस्थांचा प्रवास प्रत्यक्ष त्यांच्या गावामधूनच सुरु होवून त्यांच्याच गावातच संपेल. ही सुविधा 10 ते 18 ऑगस्ट 2016 या कालावधीसाठी आहे.
अधिक माहितीसाठी विभागीय कार्यालय दूरध्वनी क्र. 02162-239479, आगार व्यवस्थापक, सातारा-02162-230064, आगार व्यवस्थापक कराड-02164-222563, आगार व्यवस्थापक कोरेगाव-02163-220221, आगार व्यवस्थापक फलटण-02166-222379, आगार व्यवस्थापक वाई-02167-220680, आगार व्यवस्थापक पाटण-02372-283036, आगार व्यवस्थापक दहिवडी-02165-220248, आगार व्यवस्थापक महाबळेश्वर-02168-260485, आगार व्यवस्थापक मेढा-02378-285259, आगार व्यवस्थापक पारगाव खंडाळा-02169-252245, आगार व्यवस्थापक वडूज-02161-231070 अधिक माहितीसाठी या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या बुकींग सुविधेचा जास्ती जास्त भाविक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही विभाग नियंत्रकांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment